educational psychology 5

psychology
५.अध्ययन प्रक्रिया
१.अध्ययन प्रक्रिया :
ज्या क्रियामुळे आपल्या अनुभवाद्वारे कृतीद्वारे विशिष्ट हेतूच्या प्राप्तीसाठी आपल्या वर्तनात बदल घडवून येतो,परिणाम तो हेतू साध्य करण्यासाठी आपण परीस्थिशी व काही ज्ञान ,कौशल्य ,अभिवृत्ती संपादन करतो.
२.अध्ययन प्रक्रियेचे अंगे किंवा स्वरूप :
१.उद्दिष्टे : आपले ध्येय साध्य करण्याचा मार्ग .
२.प्रेरणा: स्फूर्ती किंवा चालना होय.
३.शोधण : उद्दिष्टे गाठण्यासाठी नेमका मार्ग शोधणे.
४.समायोजन : उद्दिष्टे गाठण्यासाठी परीस्थिशी मिळते जुळते करणे.
५.पुनर्रचना: प्रतिक्रियेची पुनर्रचना करणे.

३.अध्ययनाचे प्रकार :
१.शाब्दिक अध्ययन : शब्दाच्या साह्याने होते.उदा-दैनंदिन व्यवहारात अर्थपूर्ण बोलणे.
२.कारक अध्ययन : विशिष्ट हालचालीवरून कौशल्य प्राप्त करणे. उदा- सायकल चालवणे.
३.समस्या सोडवणे: आचुक प्रक्रियेचा अवलंबन करून शिकणे उदा-चुका आणि शिका

४.अध्ययन वक्र व त्याचे प्रकार व टप्पे :
१.विशिष्ट कौशल्य संपादन करतांना व्यक्तीने केलेली प्रगती व अनुशिल यातील परस्पर संबंध म्हणजे अध्ययन वक्र होय.
अध्ययन वक्राचे प्रकार :
१.ऋण वेग .
२.धनवेग.
३.प्रथम धन नंतर ऋण वेग .
अध्ययन वक्राचे टप्पे :
१.मंद गतीचा काळ .
२.जलद गतीचा काळ.
३.पाठरावस्था:-शिकणाऱ्याच्या प्रगती पथावरील शून्य प्रगतीचा टप्पा म्हणजे पठार अवस्था.
४.चढ –उताराचा काळ.
५.अध्ययन परिसीमा ओळखणे.

५.थोर्नडाईक चे अध्ययनाचे नियम:
१.सज्जतेचा किंवा तत्परतेचा नियम: शरीराच्या व मनाच्या अनुकूल अवस्थेला तत्परता म्हणतात ही परिपक्वता नंतर येते.तिच्या शिवाय अध्ययन होत नाही.तत्परता ही परिपक्वतेवर अवलंबून आहे. उदा- बालवाडीत आल्याबरोबर मुलांना वाचन लेखन शिकवू नये.
२.सरावाचा नियम: practice makes man perfect म्हणून केलेल्या अभ्यासाचा अधिक अधिक पुनरावृत्ती केली असता.त्यात सुबक कौशल्य प्राप्त होते.
उदा- सायकल चालवतांना प्रथम त्रास होतो पण अधिक सराव केल्यास आपण हेडल वरील हात सोडून नंतर सायकल चालवतो.
३.परिणामाचा नियम: एखाद्या कृतीतून वाईट किंवा चांगला परिणाम होते .त्यालाच परिणाम म्हणतात.
उदा- मुलांना चांगल्या कामाबद्दल बक्षीस प्रबलंन देल्यास त्यांना प्रोत्साहन मिळते.
वाईट कामाबद्दल रागावले ,मारले तर ती कृती ते पुन्हा करत नाहीत.

६.अध्ययन संक्रमण व त्याचे प्रकार :
अध्ययन संक्रमण: अनुभवाचे स्थलांतर होणे एखाद्या परिस्थितीत मिळवलेले ज्ञान ,कौशल्ये हे दुसऱ्या परीस्थितचे ज्ञान,कौश्याल्ये घेण्यास उपयुक्त ठरते त्याला अध्ययनाचे संक्रमण म्हणतात.
अध्ययन संक्रमण प्रकार :
१.धन संक्रमण : सायकल चालवण्यापासून मोटार सायकल चालवता येते.
२.ऋण संक्रमण : चांगले लेखन असणारा चांगले पोहू शकत नाही .
३.शून्य संक्रमण : एखाद्या गोष्टीचा उपयोग दुसऱ्या गोष्टीला होत नाही .
मराठीचे ज्ञान असल्यास इंग्रजी शिकण्यासाठी त्यांचा उपयोग होत नाही .

७.संक्रमण संबंधी निरनिराळी उपपत्ती :
१.शक्तीवादीची उपपत्ती : व्याकरण ,तर्क शास्त्र शिकण्यासाठी उपयुक्त आहे.
२. थोर्नडाईकची उपपत्ती :सामान्य घटक व उपघटक म्हणून धन संक्रमण होते.
३.जड ची उपपत्ती: सामान्यीकरण करण्याची उपपत्ती .
४.वूडवर्थची उपपत्ती : समरूप घटकाची उपपत्ती.
५.बंग्लेची उपपत्ती : सहेतून कृती करण्याची उपपत्ती.
६.बोडेची उपपत्ती: जुन्या अनुभवाला नवा अनुभव सहसंबंध जोडणे.
८.संक्रमण होणारे घटक:
१.ज्ञान : संस्कृतचे ज्ञान असेल तर मराठी व हिंदी लवकर शिकता येते.
२.तंत्र ,पद्धती ,कौशल्य : तबला वाजवणारा चांगली ढोलकी वाजू शकतो.
३.विशिष्ट दृष्टी व निष्ठा मूल्य: नेहमी खरे बोलणारा खोटे कधीच बोलत नाही चांगले आचरण करणारा वाईट आचरण कधीच करत नाही.

९.संक्रमणाचे फायदे :
१.विद्यार्थात नवीन कौशल्य येतात.
२.विद्यार्थांना सामान्यीकरण करण्यास मदत होते.
३.विद्यार्थांवर चांगले संस्कार करण्यास मदत होते.
४.विद्यार्थात आत्मविश्वास व ध्येय प्रवणता हे गुण येतात.
५.विद्यार्थांत अभ्यासाविषयी आवड निर्माण होते.

 

१०.संक्रमणाचा शिक्षणावर होणारे परीणाम:
१.अभ्यास क्रमवार होणारा परिणाम .
१.अभ्यासक्रम तयार करतांना संक्रमणचा विचार हावे.
२.विद्यार्थांचे वय,आवडीनिवडी ,अनुभव विश्व,आकलनक्षमता ,व बौद्धिक स्तर लक्षात घेऊन काही घटकाचे संक्रमण आपल्याला करता येईल यांचा विचार करावा.

२.संक्रमणाचा अध्ययन पध्दतीवर होणारा परिणाम:
१.शिक्षकांने योग्य अध्यापन पध्दतीचा उपयोग करावा.
२.शिक्षकांने परिणामकारक कारक अध्यापन करण्यासाठी आचुक अध्यापन पध्दतीची निवड करावी.
३.शिक्षकांने अध्यापन सचेतन करण्यासाठी प्रयत्नशील राहावे.
४.शिक्षकांने अध्यापनांची सूत्रे वापरून शैक्षणिक साधन सह अध्यापन करावे.

३.संक्रमणाचा वेळापत्रकावर होणारा परिणाम:
१.शालेय कार्याचा आढावा देणारा वेळापत्रक हा आरसा आहे.
२.शाळेत सप्ताहाचे वेळापत्रक असते.
३.वेळापत्रकामुळे अध्ययन –अध्यापनात सुत्रातता व नियमितपणा येतो.
४.विषयाची विभागणी .
५.तासाचा अवधी कळतो.
६.कठीण विषयाला वेळापत्रकात प्रथम स्थान द्यावे.
७.विद्यार्थांच्या शारीरिक व मानसिक योग्यता लक्षात घेऊन तासिकेचे नियोजन करावे.

११.अध्यानाच्या पध्दती व त्याचे वैशिष्टे व मर्यादा :

१.अनुकरण पध्दती (हेगार्टी ):दोन माकडावर प्रयोग
१.अनुकरण निरीक्षणावर अवलंबून आहे.
२.अनुकारांचा कौशल्य संपादन करण्यासाठी उपयोग होतो.
३.अनुकरण भाषा शिक्षण्यासाठी उपयुक्त आहे.
४.ज्ञान संपादन करता येत नाही.
५.नवनिर्मिती क्षमतेला वाव नाही.
६.विद्यार्थांच्या स्वतंत्र बुद्धीला आवस कमी आहे.

२.प्रयत्न प्रमाद पध्दती (थोर्नडाईक): मांजरावर प्रयोग .
१.चुका आणि शिका असे शिकता येते.
२.प्रयत्न प्रमाद पध्दतीने कौशल्य प्राप्त होते.
३.प्रयत्न पध्दतीने क्रिया सफाई होते.
४.प्रयत्न प्रमाद पध्दतीने शिकण्यास फार वेळा लागतो.
५.प्रयत्न प्रमाद पध्दतीत यश योगायोगानेच येते.
६.प्रयत्न प्रमाद पध्दतीत प्राप्त कौशल्याचे संक्रमण होते असे नाही.

३.अभिसंधान पध्दती (पावलाव ) कुत्रावर प्रयोग .
१.चेतक व प्रतिक्रिया याचे सहचर्य असते.
२.अनेक सवयी लावण्यास उपयुक्त पध्दती आहे.
३.प्रलोभनामुळे कृतीला प्रेरणा मिळते.
४.वैयक्तिक स्वतंत्र नष्ट होते.
५.मनुष्य यांत्रिक बनतो.
६.मनाला स्थान नाही यावर आक्षेप घेतले जातात.

४.मर्मदृष्टी पध्दती (कोहलर) सुलतान नावाचे माकड यावर प्रयोग केला.
१.समस्येवर लक्ष केंद्रीत होते.
२.मर्मदृष्टी ही अंतरदृष्टी आहे.
३.युक्तिवाद करावा लागतो.
४.मानसिक क्रियेवर अवलंबून आहे.
५.मर्मदृष्टी ही बाह्यदृष्टी नसते.
६.युक्तिवादाची मर्मजाणण्याची तयारी हवी.

१२.अध्ययनावर परिणाम करणारे घटक:
१.परिपक्वता.
२.प्रेरणा.
३.अवधान.
४.अभिरुची .
५.स्मरण व विस्मरण.
६.थकवा व कंटाळा.
७.सवय.

१३.अध्ययन परिपक्वतेवर अवलंबून आहे:
परिपक्वता म्हणजे शरीराच्या अवयवात व गुणात नैसर्गिकरित्या परिपूर्णता येणे म्हणजे परिपक्वता होय.परीपाक्वतेशिवाय अध्ययन होत नाही म्हणून अध्ययन हे परीक्वतेवर अवलंबून आहे.
१४.प्रेरणेचे अध्ययनातील स्थान:
प्रेरणा : प्रेरणा म्हणजे स्फूर्ती किंवा चालना होय ती गरजेतून मिळते.
१.आंतरिक प्रेरणा: अभिरुची ,अभिवृत्ती व तत्परता यातून मिळते.
२.बाह्य प्रेरणा: प्रलोभनातून मिळते प्रलोभन म्हणजे लालूच होय.

१५.अवधान व त्याचे प्रकार व घटक :
अवधान : अनेक चेताकापैकी एक चेतक निवडून त्यावर सर्व जाणीवा केंद्रीत करणे म्हणजे अवधान देणे होय.
अवधान प्रकार :
१.ऐच्छिक अवधान : परीक्षेत पास होण्यासाठी पाठांतर करणे.
२.अनैच्छिक अवधान : शिक्षक वर्गात शिकवत असतांना अचानक ढगात विजेचा कडकडाट झाला अवधान तिकडे गेले.
३.अभ्यस्त अवधान : ह्या अवधानासाठी एखाद्या विषयाची आवड असावी लागते.

अवधानाचे घटक :
१.आंतरिक घटक : मनस्थिती ,गरज,सवय,अभिरुची इत्यादी अवधानाचे आंतरिक घटक आहेत.
२.बाह्य घटक : जाणीव केंद्रीत करणे,लक्ष देणे इत्यादी अवधानाचे बाह्य घटक आहेत.


१६.अध्ययनावर परिणाम करणारा घटक अभिरुची :
१.विद्यार्थांमध्ये अभिरुची निर्माण करणे व ती विकसीत करणे हे अध्यापनाच्या दृष्टीने आवश्यक असते.
२.अनुभवाद्वारे अभिरुची बदल असते.
३.अवधान हे अभिरुचीचे प्रगट रूप आहे.तर अभिरुची हे अवधानाचे सुप्त रूप आहे.
४.अवधान व अभिरुची ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत.

१७.स्मरणाचे लक्षणे व विस्मरणाचे :
स्मरण व विस्मरण : स्मरण करणे म्हणजे आठवणे व विस्मरण विसरणे.
१.स्मरणाचे लक्षणे :
१.एखाद्या विषयाची आवड निर्माण होणे.
२.एखादी गोष्ट होऊन बराच काळ झाला तरी ती लवकर आठवणे.
३.जुन्या अनुभवातून नवा अनुभव घेऊन शिकणे.
४.पाठ्य विषय चटकन ग्रहण होणे व खूप दिवस धारणा ठेवणे.
५.दुखत अनुभव जाणीवेतून नेणीवेतून ठेवणे.
२.स्मरणाचे शैक्षणिक दृष्ट्या महत्व किंवा मुलांच्या अभ्यास लक्षात राहावे म्हणून लक्षात घ्यावयाच्या गोष्टी :
१.शिकण्याची तीव्र इच्छा .
२.अवधान .
३.अभिरुची .
४.महत्वाचे मुद्दे वारंवार समजावून देणे.
५.माहितीचे वर्गीकरण व संयोजन करणे.
६.सहचर्य संबंध जोडणे.
७.विश्रांती घेणे.
८.पाठांतर करणे.
९.मनन करणे.
१०.उजळणी करणे.

३.विस्मरणाचे करणे:
१.अनास्था : विषयाची आवड नसणे .
२.कालगमण: एखादी गोष्ट होऊन खूप दिवस झाल्यास ती न आठवणे .
३.निरोधन : जुन्या व नव्या अनुभवाचा दवंदव तयार होणे.
१.पुरोगामी निरोधन : जुना अनुभव हा नव्या अनुभवाला घातक ठरतो तेव्हा .
२.प्रतिगामी निरोधन : नवा अनुभव हा जुन्या अनुभवाला घातक ठरतो तेव्हा.

४.झोप : झोपे मुळे विस्मरण होते पण धारणा पक्की होते.
५.दमन : फ्राईड च्या विस्मरण होते नाही दुखद अनुभव हे जाणीवेतून नेणीवेत जातात.

१८. अध्ययनावर परिणाम करणारा घटक थकवा व कंटाळा :
थकवा: म्हणजे कार्यशक्तीची पूर्ण झिंज होणे व कंटाळा म्हणजे एखादे काम नकोसे वाटणे.
थकव्याचे प्रकार :
१.शारीरिक थकवा:
२.मानसिक थकवा म्हणजे कंटाळा होय.
१९.सवय व त्याचे प्रकार :
सवय : एखादी कृती शरीराकडून किंवा मनाकडून वारंवार घडणे त्याला सवय म्हणतात.
सवयीचे प्रकार :
शारीरिक सवय : सकाळी उठल्यावर चहा घेणे.
२.मानसिक सवय: हरिपाठ वाचून नंतर चहा घेणे.
मुख्य पृष्ठ