educational psychology 1

psychology
१.बालमानसशास्त्र स्वरूप व व्याप्ती
१.मानसशास्त्र म्हणजे वर्तनाचे शास्त्र .
१.मानवी वर्तनाचे शास्त्र –विल्सबरी.
२.वर्तनाचे अध्यन –जे.बी .वाटसन
३.व्यवहारवादी प्रमेय-वूडवर्थ
४.आत्माचे शास्त्र-प्लोटो
५.मनाचे शास्त्र –ऑरीस्टल
६.बोधावस्थेचे शास्त्र -विल्यम वूंट १९७९ साली प्रयोग केला.
७.अबोधावस्थेचे शास्त्र –विल्यम वूंट
८.सजीव प्राण्याच्या वागणुकीचे येथार्थ स्वरूप शोधून काढून मनाची मीमांसा करारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय.
९.मनुष्याच्या स्थूल –सूक्ष्म ,मूर्त –अमूर्त अशा
सर्वच प्रकारच्या आंतर –बाह्य वर्तनाचा ,स्वभावाचा ,अनुभवाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आहे.

२.बालकांचे वर्तन .
१.मानवी मनाचे प्रतिबिंब त्याच्या वागणुकीत दिसते.
२.मुलाचे काही दुखू लागले की ते रडते.आपण त्याच्यासोबत
गोड बोललो किंवा ते खेळू लागलो की ते हसते.
३.बालकांच्या वर्तनात त्याच्या मनाचे प्रतिबिंब पडलेले असते.
४.वर्तन हे बाह्य दृश्य असते असे नाही,भावना कल्पना ,विचार ,मनाची स्थिती असे अदृश घटक सुद्धा त्यात असू शकतात.
३.मानसशास्त्र विविध शाखा.
१.सामान्य मानसशास्त्र .
२.मनोविकृती मानसशास्त्र .
३ .बाल मानसशास्त्र .
४.युवक मानसशास्त्र .
५.प्राण्याचे मानसशास्त्र .
६.शैक्षणिक मानसशास्त्र .
७.ओद्योगिक मानसशास्त्र .
८.मानसं आरोग्य शास्त्र.
१०.शारीरिक मानसशास्त्र .
११.प्रायोगिक मानसशास्त्र .
१२.प्रोढाचे मानसशास्त्र व कला चे मानसशास्त्र.
शिक्षणाचा विचार करून आपल्या विषयापुरता अभ्यास करण्यासाठी
शैक्षणिक व बाल मानसशास्त्र माहिती असणे आवश्यक आहे.
४.शैक्षणिक मानसशास्त्र :
शिक्षण :- १.व्यक्तीचे प्राप्त परिस्थीशी समायोजन.
२.व्यक्तीच्या विकासाला वळण लावणे.
३.व्यक्तीचा सर्वांगीण विकास करणे.
शैक्षणिक मानसशास्त्र:
१.स्कीनर –मानवी प्राण्याच्या शैक्षणिक वातावरणातील अभ्यास .
२.जडड –शिकणाऱ्याच्या वर्तनाच्या मुळाशी असणाऱ्या प्रेरणेचा अभ्यास म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय.
३.क्रो व क्रो –व्यक्तीच्या जन्मपूर्व अवस्थापासून वृद्धा अवस्थे पर्यंत अभ्यास म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र .
४.गृथी व पॉवर्स –जे शास्त्र मानेता पावलेल्या मानसशास्त्रीय तत्वाचा उपयोग शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी करते ते शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय.

५.मानसशास्त्र व शैक्षणिक मानसशास्त्र यांचा परस्पर संबंध :
१.शरीर आणि मन याचा जेवढा संबंध आहे तेवढा.
२.मानसशास्त्र मनुष्याच्या वागणुकीचे शास्त्र आहे.तर शैक्षणिक मानसशास्त्र वागणुकीला वळण लावणारे शास्त्र आहे.
३.मानसशास्त्र हे वास्तवादी शास्त्र आहे. तर शैक्षणिक मानसशास्त्र आदर्शवादी शास्त्र आहे.
४.शैक्षणिक मानसशास्त्र अध्यन करणारी व्यक्ती ,तिचे व्यक्तिमत्व ,तिच्या विकासाच्या अवस्था,तिची अध्यन –अध्यापन प्रकिया त्याचे महत्व,त्याच्या विकासाच्या अपेक्षा त्यात निर्माण होणाऱ्या समस्या ह्या सर्वांचा अभ्यास ज्या शास्त्रात वैज्ञानिक पद्धतीने केला जातो त्यास शैक्षणिक मानसशास्त्र म्हणतात.
वरील सर्व अभ्यास मानसशास्त्र सुद्धा येतो ,म्हणूनच मानसशास्त्र व शैक्षणिक मानसशास्त्र यांचा जवळचा संबंध आहे.

६.बाल मानसशास्त्र व त्याचे विषय :
बाल मानसशास्त्र : जन्मपूर्व अवस्थेपासून किशोरावस्थेपर्यंत होणाऱ्या विविध विकासाचा अभ्यास बालमानसशास्त्र करते.
विषय:
१.बालकाच्या विकासाचे टप्पे कळतात.
२.बालकांच्या विकासाचे अंगे कळतात.
३.बालकांच्या गरजा व समस्या कळतात.
४.बालकांचे मानसिक स्वास्थ कळते.
५.बालकांची अध्यन प्रक्रिया कळते.
६.बालकाला अध्यानास प्रवृत्त करणारी अध्यापन प्रक्रिया कळते.
७.बालकांतील व्यक्तिभेद कळतात.

७.बालमानसशास्त्राची गरज व महत्व :
१.पूर्वीच्या काळी फक्त बालकाच्या शारीरक विकासाला महत्व दिले जात होते.
२.५० वर्षात मानसशास्त्राचे संशोधन आणि संशोधना अंती हे दाखवून दिले की बालक म्हणजे प्रोढ माणसाची लघु आवृत्ती नव्हे.
३.बालकाचे शारीरिक विकासाबरोबर दहा प्रकारे विकास होतात.
४.शिक्षकांनी बाल मानसशास्त्राचे विषय अभ्यासावे.
८.शिक्षकाला बाल मानसशास्त्राच्या अध्यानाची आवश्यकता :
शिक्षकाने बाल मानसशास्त्राचे विषय कृपया अभ्यासावे त्याशिवाय सर्वांगीण
शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमातून शैक्षणिक प्रगतीला हातभार लागणे
फारच कठीण आहे.

९.वर्तन अभ्यासाच्या विविध पद्धती :
१.निरीक्षण पद्धाती : निरीक्षण म्हणजे बारकाईने पाहणी करणे ,नुसते पाहणे वेगळे व बारकाईने पाहणे वेगळे आहे.
निरिक्षणाचे प्रकार :
१.आत्म निरीक्षण : स्वताचे स्वत: केलेले निरीक्षण आत्मनिरीक्षण होय.
मर्यादा:
१.आपण स्वत;निरीक्षण तटस्थपणे करू शकत नाही.
२.केवळ योगी,संत ,मनावर ताबा असणारे करू शकतात.
३.आपणच अनुभवणे व आपणच निरीक्षण करणे हे एका व्यक्तीकडून होणे कठीण आहे.
४.मन स्थूल नसून सूक्ष्म आहे शिवाय मनाच्या अवस्था क्षणाक्षणा बदलतात.
५.वेडसर,मंदबुद्धी ,प्रौढकी मारणारे लोक हे निरीक्षण करू शकत नाहीत .
६.स्वत:चे निरीक्षण म्हणजे आत्म निरीक्षण व दुसऱ्याचे निरीक्षण करणे म्हणजे बाह्य निरीक्षण होय.
२.बाह्य निरीक्षण : आई –वडिल व इतर ही सर्व लोक बालकांचे निरीक्षण करतात त्यांना बाह्य निरीक्षण म्हणतात.
मर्यादा:
१.आपले मुल माकड असले तरी ते मदन वाटते म्हणून निरीक्षणामध्ये नि:पक्षपाती पणा नसतो.
२.एखादे निरीक्षण योग्य प्रकारे झाले नाही तर तसे वर्तन घडण्याची वाट पाहावी लागते.
३.वर्तनाला परिस्थितीच्या वातावरणातून वेगळे करणे कठीण आहे.

३.नियंत्रित किंवा प्रायोगिक निरीक्षण :
१.नियमित वातावरणातील प्रयोग म्हणजे प्रायोगिक निरीक्षण होय .
२.प्राप्त परिस्थीतीशी संपूर्ण नियंत्रण ठेवून त्यातील घटकात योग्य बदल करून
त्याच्या परिणामांचे प्रयोजकाने केलेले निरीक्षण म्हणजे प्रायोगिक निरीक्षण होय.
३.या निरीक्षणात दोन व्यक्तीची गरज आहे,एक प्रयोज्य ,दुसरा प्रायोजक .
४.हे प्रयोग फक्त जीवंत प्राणी मात्रावर केले जातात.

मर्यादा:
१.सगळेच घटक नियंत्रित करणे कठीण आहे.
२.मनुष्य प्रयोगाच्या वेळी मनातील भावना लपवितो म्हणून निष्कर्ष चुकीचे निघतात.
३.प्रयोग हे फक्त प्रयोग शाळेतच करता येतात म्हणून कृत्रिम परिस्थित घडणाऱ्या प्रतिक्रिया ह्या नैसर्गिक असतात असे नाही.
४.प्रयोज्याचे सहकार्य मिळत नाही.
५.प्रयोग शाळेत गुंतागुतीची परिस्थिती निर्माण करणे कठीण असते.
समस्येवर प्रयोग करता येत नाहीत.

निरीक्षण पद्धतीचे वैशिष्टे :
१.ही सोपी अभ्यास पद्धती आहे.
२.अंतर निरीक्षणासाठी कोणतीही साधन सामुग्री आणि बाह्य निरीक्षणासाठी थोडी असली तरी पुरी आहे.
३.निरीक्षणामुळे खरी माहिती मिळते व ती बऱ्याच प्रमाणात वस्तुनिष्ठ असते.
४.नियंत्रीत निरीक्षणासाठी प्रयोगशाळेत स्थैर्यमापन ,छाया यंत्र ,निरीक्षण घुमट,इत्यादी साधनाचा उपयोग करावा लागतो.

निरीक्षण पद्धतीच्या मर्यादा:
१.अ –निरीक्षण :- डॉक्टर ला एखाद्या रोगाचे निदान झाले नाही तर त्यावर औषध उपचार योग्य होणार नाही .
२.अप –निरीक्षण : -जेव्हा ज्ञानेंद्रीये व्यवस्थित काम करत नाहीत तेव्हा आहे त्यापेक्षा वेगळी स्थिती दिसते त्यास अप-निरीक्षण म्हणतात.

२.सर्वेक्षण पद्धती :
बालकाची सर्व बाजूंनी केलेली पाहणी म्हणजे सर्वेक्षण होय.
वैशिष्टे :
१.सर्वेक्षणामुळे वस्तुस्थितीचे ज्ञान मिळते.
२.विशेष गरजा,समस्या,याचे ज्ञान होते.
३.वस्तुस्थीचे विश्लेषण करता येते.
४.बालकल्याण उपक्रमासाठी सर्वेषण उपयुक्त होय.
५.सर्वेक्षण हे नियोजनाला पायाभूत असते.

मर्यादा :
१.शास्त्रज्ञांना आवडीची पद्धती पण कठीण आहे.
२.गटाने अभ्यास करतांना तसा गटवार अभ्यास करता येत नाही .
३.पालकाचे व इतर व्यक्तीचे सहकार्य मिळत नाही .
४.सर्वेक्षण करतांना वेळ खूप वाया जातो.

३.प्रायोगिक पद्धती :
प्रायोगिक पद्धती म्हणजे नियंत्रित निरीक्षण पद्धती होय.

४.जीवन वृत्तांत पद्धती :
बालकाच्या जीवनाचा वृत्तांत गोळा करून त्याद्वारे त्याच्या वर्तनाचा अभ्यास करण्याच्या पद्धतीला जीवन वृत्तांत पद्धती म्हणतात.
वैशिष्टे :
१.प्रश्न रूप बालकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ही पद्धती उपयुक्त आहे.
२.मुल कसे वागते हे निरीक्षकांना कळते.
३.त्याचे जीवन सुखकर करता येते.
४.बालकांचा कुटुंब व वयैक्तिक माहिती घेता येते.

मर्यादा:
१.बालाकासंबंधी इतर लोक योग्य माहिती देत नाही .
२.प्रश्नावली करणे सोपे नाही.
३.साक्षर लोकासाठी ही पद्धती उपयुक्त पण निरीक्षर लोकांसाठी कठीण आहे.
४.प्रश्नावलीतील प्रश्न न वाचता अंदाजे खुणा करण्याची शक्यता असते.

५.प्रक्षेपण पद्धती (रोशार्क चाचणी )
मनुष्यांच्या भावना,इच्छा ,मूल्य,हे त्याच्या कृतीतून व्यक्त होत असतात.
इतर वस्तूवर ही तो आपल्या भावना लादत असतो त्यालाच प्रक्षेपण म्हणतात.

वैशिष्टे :
१.वाक्यापुर्ती :मी शाळेतून घरी गेल्यावर............
२.गोष्ट पूर्ण करा.-एक मुलगा होता तो हुशार आहे .........
३.बाहुल्या खेळ:-भातुकलीच्या खेळातून आई –वडिलांच्या भावना ........
४.चित्र काढणे :-रोशार्क कसोटी २० चित्रे असतात.
५.दैनंदिनी :- मुलांना रोज लिहिण्यास सांगणे ....................

मर्यादा :
१.या पद्धतीचा उपयोग जाणकारच करतात कारण निष्कर्ष काढतांना खबरदारी घ्यावी लागते.
२.मुल अज्ञानाने ,संशयाने खरे किंवा खोटे बोलते त्यामुळे निरीक्षण अंदाज चुकतो.
३.समस्या प्रधान बालकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ही पद्धती उपयुक्त आहे.
४.बालकांच्या वर्तनाना योग्य अर्थ लावणे हे तज्ञाचे काम आहे .

६.समाजामिती पद्धती :
मोरेंनी १९४२ समाजामिती तंत्र हे नाव दिले .
जेकीन्स १९४७ नामनिर्देशन तंत्र हे नाव ठेवले.
वैशिष्टे :
१.बालकांच्या सामाजिक संबंधांना अनुसरून केलेले मापन म्हणजे समाजामिती होय.
२.व्यक्ती च्या वर्तनाचा अभ्यास म्हणजे समाजमिती होय .
३.जो नेता सर्वांना आवडतो त्याला स्टार समजावे .
४.जो कोणालाही आवडत नाही तो एकाकी समजावे .
५.समाजमिती आलेखानुसार मुलाचे संबंध पाहता येतात.
६.आदर्श विद्यार्थांची निवड करण्यासाठी उपयुक्त पद्धती आहे.

मर्यादा :
१.या साधनाची रचना करणे कठीण आहे.
२.आलेखात दिसणारे गट नेहमीच सारखे राहत नाहीत.
३.विद्यार्थांने दिलेली माहिती गुप्त न राहिल्यास त्यांचे माने कलुषित होतात.
४.विद्यार्थीना हे तंत्र माहिती झाल्यास विद्यार्थी खोटी माहित देतात.

मुख्य पृष्ठ