२.वाढ व विकास |
१.वाढ व विकास याची व्याख्या : १.वाढ :-सतत चालणारी प्रगती होय. २.विकास :- परीक्वतेच्या दिशेने परिवर्तन . ३.वाढ व विकास :- ही बालकाच्या परिवर्तनाची दोन रूपे आहेत. |
२.वाढ व विकास यातील फरक : १.वाढ हे मुलामध्ये होणारे इष्ट ते परिमाणात्मक बदल म्हणजे वाढ होय. व विकास म्हणजे मुलामध्ये होणारे इष्ट ते परिमाणात्मक व गुणात्मक बदल म्हणजे विकास होय. २.वाढचे क्षेत्र मर्यादीत आहे. व विकासाचे क्षेत्र व्यापक आहे. ३.वाढ ही परिमाणात्मक असल्यामुळे आपण तिचे मापन सहज करू शकतो. उदा-उंची,वजन व विकास हा परिमाणात्मक बरोबर गुणात्मक आहे फक्त गुणात्मक विकासाचे मापन करू शकत नाही .उदा-भाषा विकास ,भावनिक विकास . ३.वाढ ही अनुवांशिकतेवर अवलंबून असते व विकास मात्र अनुवंशिकते बरोबर बाह्य परिस्थीतीवर अवलंबून असतो. |
३.विकासाचे तत्वे (एलिझाबेथ हरलोक ) १.विकास हा सातत्याने होतो. २.विकासाचा क्रम असतो. उदा-रांगणे,बसणे,उभेराहणे ,चालणे,उड्यामारणे , ३.विकासाची गती सामान्याकडून विशिष्टाकडे असते. उदा-प्रथम शरीर हलविणे,नंतर डोके व हातपाय हलविणे ४.विकास एकदम होत नाही. उदा-एकदम दात येत नाही,किंवा वजन वाढत नाही. ५.विकासाचे स्वरूप बालपणी स्थिर होते व विकासात व्यक्तीभेद स्पष्ट दिसतात. ६ .विकासाचा वेग प्रत्येक भागासाठी वेगळा असतो. उदा –हात पायाची वाढ ही बाल्यवस्था मध्ये होत नाही तर किशोर वस्था मध्ये होते. ७.विकासाचे गुणधर्म एकमेकांशी संबंधित असतात.उदा-हुशार मुले सर्व क्षेत्रात प्रगती करतात पण मंदबुद्धीचे मुले आपली प्रगती करून घेत नाहीत. ८.मुलांच्या विकासासंबंधी भविष्य वर्तविता येते. ९.प्रत्येक विकास अवस्थेची काही वैशिष्टे असतात.उदा –गर्भावस्थेत विकास वेगाने होतो तर कुमारावस्था मध्ये लैंगिक विकास होतो. १०.प्रत्येक व्यक्तीला या विकास अवस्थेतून जावे लागते. |
४.विकासात होणारे बदल : १.आकारात बदल :-उदा-वजन,उंची. २.प्रमाणात बदल:- उदा-शरीर मध्ये प्रमाण बद्धता येते. ३.काही लक्षणे लुप्त होणे:- उदा-दुध दात पडणे ,बोबडे बोलणे संपते. ४.नवीन लक्षणे संपादन होणे:- नवीन दात येणे ,स्पष्ट भाषा बोलणे. |
५.विकासाचे करणे : |
६.बालकांच्या विकासाचे टप्पे (अवस्था ) |
७.सर्वांगीण विकास . बालकांच्या दहा अंगाचा विकास होणे म्हणजे सर्वांगीण विकास होय. १.शारीरिक विकास. २.गतिविकास. ३.संवेदनात्मक विकास. ४.संबोध विकास . ५.भावनिक विकास. ६.भाषिक विकास. ७.सामाजिक विकास. ८.बौद्धिक विकास. ९.सर्जनात्म विकास . १०.सौदर्यात्मक विकास. |
८.सर्जनशीलता व सर्जनशीलतेचे मानसशास्त्रीय घटक: सर्जनशीलता:-काही तरी नवीन निर्माण करण्याची क्षमता म्हणजे सर्जनशीलता होय. सर्जनशीलतेचे मानसशास्त्रीय घटक: १.प्रवाहित्व :-कल्पना,विचार,योजना,अखंड ओघ असणे . २.मौलिकता:-कल्पना,विचार,योजना,यात नवीनता आणणे. ३.लवचिकता :-कल्पना ,विचार ,योजना,सुचने . ४.विस्तार:अपूर्णता पूर्ण करणे . ५.पुनर्व्याख्या :-जुन्या व्याख्याची नवीन व्याख्या करणे. ६.समस्याविषयी संवेदनशीलता:गुण-दोष शोधणे. |
|
१०.बालकांची सर्जनशीलता दिसून येणारी कृती: १.काठीचा घोडा बनविणे. २.बाहुलीला जीवंत समजून तिच्या सोबत खेळणे व बोलणे. ३.आगकाडी चे घरे,मातीचे किल्ले,कागदी होडी तयार करणे. ४.पुस्तकातील चित्राची नक्कल करणे. |
११.सर्जानशीलतेवर परिणाम करणारे घटक: १.लोकशाही पद्धतीचा अवलंब करणे. २.विद्यार्थांना निर्णय घेण्याचे स्वतंत्र देणे. ३.विद्यार्थांच्या इच्छेप्रमाणे काम करण्याची संधी देणे. ४.विद्यार्थांना चांगल्या गोष्टी बदल प्रोत्साहन देणे. ५.विद्यार्थांची चांगल्या गोष्टीत जिज्ञासा वाढवणे. ६.विद्यार्थात योग्य सामाजिक अंतराक्रिया घडवून आणणे. |
१२.व्यक्तिमहत्व विकास व व्यक्तिमहत्व विकासाच्या दृष्टीने विविध विकासांचे महत्व : १.क्रियात्मक विकास :-पालथे पडणे,रांगणे,बसणे,उभे राहणे,चालणे,उड्या मारणे,स्नायूवर ताबा आल्यावर विविध खेळ खेळणे. २.भाषा विकास:रडणे ,हुंकांर देणे,तोंडाने आवाज काढणे,एक शब्द उच्चारणे ,दोन शब्द उच्चारणे ,वाक्य उच्चारणे व अश्खलीत भाषा बोलणे.गुप्त भाषा बोलणे, ३.सामाजिक विकास:-आई,कुटुंब,शेजार ,समाज,शाळा,देशातील विशिष्ट व्यक्तीचा परिचय. ४.भावनात्मक विकास:-दयाळू ,उदार,कंजूस,बहिर्मुख,अंतर्मुख,जिव्हाळा ,हलवेपणा,क्रोध,भीती,जिज्ञासा ,हर्ष,प्रेम, ५.मानसिक विकास:- आपलेपणा ,प्रेम,सुरक्षितता,स्वीकार,स्वतंत्र व्यक्तिमहत्वाचा सन्मान ,मनोरंजन,मित्रसहवास. ६.बौद्धिक विकास:-( पियाजे ) १.० ते २ वर्ष -संवेदनकारक विचार प्रक्रिया . १. १ महिना ते ४ महिने :-स्वताच्या इद्रियांचा शोध . २.४ महिने ते १० महिने:-बाह्य वस्तूचा शोध . ३. १० महिने ते १२ महिने :- अनेक क्रियांमध्ये संयोजन. ४.१२ महिने ते १८ महिने :- शोध क्रियाशील व परिस्थिती बदल घडवून आणणे. ५.१८ महिने ते २४ महिने :- शारीरिक क्रीयाद्वाराचे काम मानसिक क्रीयाद्वारे करते. २.२ वर्ष ते ६ वर्ष -क्रीयापूर्व विचार प्रक्रिया. ३. ६ वर्ष ते १२ वर्ष –मूर्त स्वरूपातील विचार प्रक्रिया . ४.१२ वर्ष ते १४ वर्ष –अमूर्त स्वरुपाची व औचारिक विचार प्रक्रिया. यातून तर्क ,स्मुर्ती ,अवबोध,संबोध . |
१३.शारीरिक विकासात अन्नाचे महत्व : १.प्रथिने शाकाहारी १३ टक्के व मासाहारी १४ टक्के . २.चरबी शाकाहारी ३२ टक्के व मासाहारी ३१ टक्के . ३.कार्बोहाड्रेड शाकाहारी ५५ टक्के व ५५ टक्के. ४. सकाळी ६.०० पासून ६.०० पर्यंत विविध गोष्टीचा संतुलित आहार . |
१४.बालकाच्या विकासावर परिणाम करणारे घटक : १.अनुवंश किंवा अनुवंशिकता. २.वातावरण किंवा परिस्थिती . |
१५.अनुवंशिकता व त्याचे प्रकार : अनुवंशिकता :-वंशपरंपरेने आई –वडिल यांच्या कडून किंवा आजी –आजोबा कडून किंवा पीडयान पिड्यातून अशंत गुण मुलामध्ये येतात त्यास अनुवंशिकता म्हणतात. १.वैयक्तिक किंवा जैविक अनुवंशिकता: एकाच व्यक्ति कडून गुणधर्म येतात . उदा-शारीरिक ठेवण ,रंग ,उंची,वजन,बुद्धिमत्ता. २.सामाजिक अनुवंशिकता:समाजाकडून गुणधर्म मुलामध्ये येतात. उदा –राहणीमान,भाषा ,रूढी परंपरा. |
१६.अनुवंशिकतेने येणारे गुणधर्म : १.लिंगनिश्चिती:- स्त्रीलिंग/पुल्लिंग २.जातीसाम्यता: शरीराची ठेवण,रंग ,उंची,वजन. ३.व्यक्तिगत अंतर :-दोन जुळ्या भावातील सर्वच गोष्टी वेगळ्या असतात. ४.वारस: हा वारसा पीडया पीडयातून येतो. ६.उदभव विकास :-बुद्धिमत्तेचे संक्रमण होते. |
१७.अनुवंशिकतेचे शिक्षणातील महत्व : १.स्त्रियांना व पुरुषांना समान वागणूक देणे. २.काही शारीरिक दोष असल्यास डॉ .कडून दूर करून घेणे. ३.विद्यार्थांचे व्याक्तीभेद लक्षात घेऊन अध्यापन करणे. ४.विद्यार्थांच्या उपजत गुणांना वाव देणे. ५.विद्यार्थांच्या पूर्व ज्ञानाचा उपयोग करून नवीन ज्ञान देणे. |
१८.परिस्थिती किंवा वातावरणाचे प्रकार : वातावरण : आपल्या सभोतालाचा भाग म्हणजे वातावरण होय. वातावरणाचे प्रकार : १.नैसर्गिक वातावरण : भौगोलिक रचनाचा संबंध . २.सामाजिक वातावरण : आई ,कुटुंब ,शेजार,समाज, ३.वैयक्तिक वातावरण : एका व्यक्तीच्या सान्निध्यात राहणे. |
१९.बालकाच्या विकासाच्या दृष्टीने योग्य वातावरण महत्व : १.विद्यार्थांना अनेक गोष्टीतून उपजत गुणांना वाव मिळतो. २.विद्यार्थात आदर्श निर्माण होऊन प्रेरणा मिळते. ३.विद्यार्थांना शिक्षकांच्या सान्निध्यात राहण्याची संधी मिळते. ४.विद्यार्थासाठी शालेय कार्यक्रमातून वातावरण निर्मिती करता येते. |
२०.अनुवंश व वातावरण ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू प्रमाणे आहेत . अनुवंश गुणीला वातावरण बरोबर शिक्षण होते म्हणून अनुवंश व वातावरण ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. |
२१.बालकांच्या विकासाला पोषक ठरतील असे शाळेतील व शाळेबाहेरील उपक्रम : १.बालगीते,समूह गीते ,बडबड गीते,बालनाट्के ,-बालकांची भाषा शुध्द होते.बौद्धिक विकास होता. २.बाग काम :सौदर्यात्मक विकास होतो. ३.चित्र कला,रंग काम,कातरकाम,टाकाऊ वस्तूचा वापर :-या उपक्रमातून सर्जनशीलता निर्माण होते. ४.सांस्कृतिक कार्यक्रम :सामाजिक विकास. ५.पाळीव प्राण्याचे संगोपन :-भावनिक विकास होतो. ६.सहली:-जीवन अनुभव मिळून बौद्धिक विकास होतो. ७.योगासने :-शारीरिक विकास होतो. ८.खेळ व क्रीडास्पर्धा :-शारीरिक विकास होतो. ९.पूरक आहार योजना :-शारीरिक विकास होतो. १०.ज्ञानद्रीयांना अनुभूतीदेणारे व्यवसाय :-बौद्धिक विकास होतो. ११.तोंडी भाषेचे खेळ :-बौद्धिक विकास व भाषा विकास होतो. १२.वृक्षारोपण :-सौदर्यात्मक विकास होतो. |
२२.स्व'ची जाणीव व त्याचे प्रकार : स्व'ची जाणीव : बालक वाढते व विकसीत होते तसे तसे त्याचे अनुभव क्षेत्र वाढत जाते .स्पीटझ मते स्व"ताच्या संबंधीच्या अनुभवला स्व'ची जाणीव म्हणतात.पंधराव्या महिन्यात बालकांना स्व'ची जाणीव होते. स्व'ची जाणिवेचे प्रकार : १.भौतिक स्व ": आपले शरीर ,घर ,कुटुंब याची जाणीव होणे. २.सामाजिक स्व':आपले मित्र ,शिक्षक, याची जाणीव होणे. ३.अध्यात्मिक स्व ": सर्व जाणीवा चा समूह . |
२३ .स्व 'च्या जाणीवेवर परिणाम करणारे घटक : १.शारीरिक घटक : कुरूप मुलापेक्षा स्वरूप मुलात अधिक असते. २.बौद्धिक सामर्थ्य :प्रज्ञावंत मुलांत दिसून येते. ३.मानसिक स्वास्थ :मानसिक स्वास्थ चांगले असलेल्या मुलात दिसून येते. ४.शालेय यशापयश :यशामुळे अभिमान तर अपयशामुळे दुराभिमान वाटतो. ५.पालकांची मनोवृत्ती : पालकांचा अंती लाडामुळे स्व'ची नष्ट होते. ६.लैगिक भिन्नता :मुला मुली समान वागणूक देणे. ७.सामाजिक स्वीकार :-समाजाने मुलांच्या वागणुंकींचा स्वीकार करणे. |
२४.बालकांची स्व 'ची जाणीव योग्य प्रमाणे विकसीत व्हावी म्हणून शिक्षक नात्याने करायचे प्रयत्न : १.कुरूप मुलात न्यूनगंड निर्माण होऊ नये. २.सामान्य बुद्धीमात्तेच्या मुलांना त्यांच्या गतीने शिकवणे . ३.विद्यार्थांचे मानसिक स्वास्थ चांगले राहण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे. ४.विद्यार्थांना शाळेतील अपयशामुळे वैफल्य निर्माण होऊ नये याची काळजी घेणे. ५.विद्यार्थांना घरच्यावानी प्रेम करावे. ६.सर्व मुला मुलींना समान वागणूक देण्यात यावी . ७.विद्यार्थाच्या चांगल्या वागणुकीचा समाजाने सुद्धा स्वीकार करायला हवा. व वाईट वागणुकी साठी त्याला मार्गदर्शन करावे. |
२५.समायोजन व त्याचे प्रकार : समायोजन : व्यक्तीने परीस्थीशी मिळते जुळते करणे म्हणजे समायोजन करणे होय. समायोजानाचे प्रकार : १.सामान्य समायोजन : आज्ञा पाळणे,नियमाचे पालन करणे. २.उपसामान्य समायोजन : आज्ञा न पाळणे ,नियमांचे उलंघन करणे. |
२६.उपसामान्य किंवा कू –समायोजनाची करणे: १.कौटुबिक परिस्थिती :घराची आर्थिक परिस्थिती . २.ईर्ष्या मत्सर :कुटुंबात मुलांना सारखे प्रेम न मिळाल्या मुळे . ३.बौद्धिक पातळी:शाळेतील इतर मुले बुद्धिमान मुलांचा राग करतात. ४.व्यंग : व्यंग असलेल्या मुलात न्यूनगंड निर्माण होतो. ५.संघर्ष : मनाची व्दिधावस्था होते. |
२७.बालकांचे समायोजन व्हावे म्हणून शाळेतील उपक्रम / विकास बरोबर समयोजनाची आवश्यकता : १.घराची आर्थिक परिस्थिती चांगली नसली तरी चांगले संस्कार मिळायला हवे. २.कुटुंबात सर्व मुलावर घराच्याने सारखे प्रेम करावे. ३.शाळेत मुले एकमेकांचा द्वेष करत नाही ना यांच्याकडे शिक्षकांने लक्ष द्यावे. ४.अपंग मुलासाठी स्वतंत्र शाळा असावी. ५.विद्यार्थाच्या मनात संघर्ष निर्माण होऊ नये. |
२८.सहजप्रवृत्ती : १९०८ साली विल्यम मकडूगळ ने शोधून काढली. ज्या विशिष्ट प्रवृतीमुळे एखाद्या व्यक्तीचे अथवा प्राण्याचे एखाद्या विशिष्ट गोष्टीकडे लक्ष खेचले जाते.त्याच बरोबर त्याच्या भावनाचे आंदोलन निर्माण होते आणि विशिष्ट वर्तनाची प्रेरणा मिळते त्या प्रवृतीला सहजप्रवृत्ती म्हणतात. |
२९.सहजप्रवृत्तीचे वर्गीकरण : २.वंश निष्ठ सहजप्रवृत्ती : -- |
३०.सहजप्रवृत्तीचे उन्नयन किंवा उदात्तीकरण : सहजप्रवृतीचे उन्नयन करणे म्हणजे त्याला चांगल्या पातळीवर नेणे. उदा:-कामप्रवृत्ती :-मोहित होणे,आकर्षित होणे.संस्कृतीची जाणीव निर्माण करून देणे. |
३१.सहजप्रवृत्तीचे शिक्षणात महत्व : १.विद्यार्थाला त्याच्या सहजप्रवृत्ती नुसार शिक्षकाने शिकवावे. २.विद्यार्थांना प्रोत्साहन द्यावे. ३.विद्यार्थात जिज्ञासा जागृत करावी . ४.विद्यार्थात गोंधळ घालण्याची प्रवृत्ती असते तेव्हा त्याला क्रीडांगणावर अधिक गोंधळ घालू देणे.त्यांचे लक्ष अपोआप पाठाकडे लागेल. ५.सहजप्रवृत्ती दडपून विद्यार्थात न्यूनगंड निर्माण होतो असे होता कामा नये. ६.तापल्या तव्यावर पोळी भाजून घ्या .म्हणजे जोपर्यंत सहजप्रवृत्ती कायम आहे त्यांचा पुरे पूर फायदा घ्या तेव्हाच शिकवा. |
३२.सहजप्रवृत्तीवर घेतलेले आक्षेप : १.सहजप्रवृत्ती उपपत्ती सांगते कारण मिंमास सांगत नाही. २.मानवी वर्तन व सहजप्रवृत्तीचे चक्रीय विधान आहे. ३.सहजप्रवृत्तीत मानवाच्या वर्तनापेक्षा प्राण्याचे वर्तन अधिक स्पष्ट झाले आहे.कारण मकडूगल यांनी प्राण्यावर प्रयोग केला. ४.सहजप्रवृत्ती काही अंशी चुकीची आहे असे सामाजावाद्याने विधान केले आहे. |
मुख्य पृष्ठ |