४.मानसिक स्वास्थ |
१.मानसिक स्वास्थ व त्याचे लक्षणे : १.व्यक्तीमहत्वाचे विविध पैलू मध्ये सुसंवाद म्हणजे मानसिक स्वास्थ होय. २.मानसिक स्वास्थ म्हणजे मनाचे आरोग्य होय. ३.स्वता:बदल आत्मविश्वास म्हणजे मानसिक स्वास्थ होय. मानसिक स्वास्थाची लक्षणे : १.निर्मळ ,संतुलित ,स्वच्छ ,बलशाही शरीर व मन हे मानसिक स्वस्थाचे लक्षण होय. २.मानसिक स्वास्थ असलेली व्यक्ती संतुलित आहे. ३.मानसिक स्वास्थ असलेली व्यक्ती चांगल्या गोष्टीत दोष काढत नाही. ४.मानसिक स्वास्थ असलेली व्यक्ती दुसऱ्याचा अकारण हेवा करत नाही. |
२.मानसिक अस्वास्थ व त्याचे लक्षणे : मानसिक अस्वास्थ : मन विकृत बनणे म्हणजे मानसिक अस्वास्थ होय. मानसिक अस्वास्थ लक्षणे : १.घाणेरडे:असंतुलित ,अस्वच्छ् व दुर्बल शरीर व मन म्हणजे मानसिक अस्वस्थाचे लक्षण होय. २.मानसिक अस्वास्थ असलेली व्यक्ती संतुलित नसते. ३.मानसिक अस्वास्थ असलेली व्यक्ती चांगल्या गोष्टीत दोष काढते. ४.मानसिक अस्वास्थ असलेली व्यक्ती दुसऱ्यांचा अकारण हेवा करते. |
३.मानसिक अस्वास्थाची करणे: १.गरजाची पूर्ती न होणे:- अन्न,वस्त्र,निवारा. २.अपयश : शाळेतील अपयशामुळे. ३.वर्चस्वभावना:-घरी,दारी,शाळेत,वर्चस्व गाजवणे. ४.मान्येतीची आकांक्षा :-पैसा व सत्ता मिळवण्याचा धडपड. ५.कु-समायोजन :-परिस्थितीशी मिळते जुळते करता येत नाही. ६.भग्न कुटुंबे : घरातील आई –वडिल यांचे सतत भांडणामुळे. ७.निराशा: अशा असून निराशा होते. ९.संघर्ष : मनाची व्दिधा अवस्था होते.हे मानवी जीवनाचे वैशिष्टे आहेत.यालाच मानसिक ताणाचा राजा म्हणतात . १.हे ही हवे-ते ही हवे. २.हे ही नको-ते ही नको. ३.दोन्ही हवे –दोन्ही नको . |
४.मानसिक अस्वास्थाचे अध्ययन–अध्यापनावर होणारे परिणाम : १.विद्यार्थाच्या गरजाची पूर्तता न झाल्यास कु-पोषण होते.त्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही. २.विद्यार्थांच्या अपयशामुळे पुढील शिक्षण घेणे कठीण होते. ३.विद्यार्थात वर्चस्व भावना निर्माण झाल्यास मानसिक अस्वास्थ निर्माण होते. ४.विद्यार्थांना समाजाने मान्यता न देल्यामुळे समाज विघातक वर्तन करते. ५.विद्यार्थांना परिस्थितीशी मिळते जुळते करता येत नाही म्हणून शिक्षणात लक्ष लागत नाही. ६.विद्यार्थान मध्ये रोजच्या घरातील आई वडिलांच्या भांडणामुळे मानसिक अस्वास्थ निर्माण होते. ७.विद्यार्थी इच्छा पूर्ण होत नाही त्यामुळे वैफल्य निर्माण होते. ८.विद्यार्थांच्या काही अशा असतात पण त्यापूर्ण होत नाहीत म्हणून निराशा निर्माण होऊन कोणतेही काम व्यवस्थित करता येत नाही. १०.विद्यार्थांच्या मनाची द्विधा अवस्था निर्माण होऊन त्यात संघर्ष निर्माण होतो व हा अध्ययन –अध्यापनच्या दृष्टीने अतिशय घातक असतो.यामुळे विद्यार्थात मानसिक ताण निर्माण होतो व मानसिक अस्वास्थ निर्माण होते. |
५.विद्यार्थांचे मानसिक स्वास्थ राखण्यासाठी शिक्षकाने योजावयाचे उपाय किंवा मानसिक स्वास्था चे शैक्षणिक दृष्ट्या महत्व : |
६.विद्यार्थाचे मानसिक स्वास्थ राखण्यासाठी शाळेने योजावयाचे उपाय: १.योग्य वातावरण निर्मिती करणे. २.विविध उपक्रमाचे आयोजन करणे. ३.प्रथामोपराची सोय करणे. ४.मानसिक आरोग्य केंद्राची स्थापना करणे. |
७.विद्यार्थांचे मानसिक स्वास्थ राखण्यासाठी कुटुंबाने योजावाचे उपाय: १.कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली करणे. २.कुटुंबातील सगळ्या मुलांवर सारखे प्रेम करावे. ३.कुटुंबाने मुलांवर चांगले संस्कार करावे. ४.कुटुंबाने मुलाच्या गरजाची पूर्तता करावी. |
८.संरक्षण यंत्रणा व ती निर्माण होण्यासाठी करणे किंवा मानसिक ताण कमी करण्याचे करणे. मानसिक अस्वास्थामुळे संरक्षण यंत्रणा निर्माण होते. १.कृतक किंवा मिथ्या समर्थन :आपल्या चुकीची कबुली देणे. २.प्रक्षेपण :आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्याच्या फोडणे. ३.प्रतीपुरण: आपल्या अपयश अन्य कारणाने भरून काढणे . ४.तादात्म्य : आपल्या उणीवा झाकण्यासाठी दुसऱ्याचे उदा.देणे. ५.विस्थापन : आपल्या राग दुसऱ्यावर काढणे. ६.दिवा स्वप्न : आपल्या कडून काहीच होत म्हणून दिवा स्वप्न पाहणे. ७.विपरीत रुपण : आपल्या मनाविरुद्ध गोष्ट घडणे . ८.परागमन: आपले दुख विसरण्याचा प्रयत्न करणे. ९.दमण : आपल्या इच्छा ,आकांक्षा ,बळजबरीने दाबून टाकणे. १०.उदात्तीकरण : आपण चांगल्या पातळीवर काम करावे.
|
९.अभ्यासक्रम व मानसिक स्वास्थ संबंध :
|
१०.अध्यापन पध्दती व मानसिक स्वास्थ : १.शिक्षकांने योग्य अध्यापन पद्धतीचा उपयोग करावा. २.शिक्षकांचे परिणामकारक अध्यापन करण्यासाठी आचुक अध्यापन पध्दतीची निवड करावी . ३.शिक्षकांनी सचेतन अध्यापन करण्याचा प्रयत्न करावा. ४.शिक्षकांनी अध्यापनात शैक्षणिक साधनांचा वापर करावा. |
११.शाळेतील प्रशासन व मानसिक स्वास्थ : १.विद्यार्थांसाठी लोकशाही पध्दतीचा अवलंबन करणे. २.विद्यार्थांना स्वत:निर्णय घेण्याचे स्वतंत्र देणे. ३.विद्यार्थांना इच्छा प्रमाणे कार्य करण्याची संधी देणे. ४.विद्यार्थांना चांगल्या गोष्टीबद्दल प्रोत्साहन देणे. ५.विद्यार्थांची चांगल्या गोष्टीत जिज्ञासा वाढवणे. ६.विद्यार्थांत योग्य सामाजिक अंतर क्रिया घडून आणणे . |
१२.मानसिक स्वास्थ व शिस्त यांचा संबंध : १.विद्यार्थांना शिक्षा करू नये. २.विद्यार्थांना चांगल्या गोष्टीबद्दल प्रबंलन द्यावे. ३.विद्यार्थांच्या चुका लक्षात आणून देऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करणे. ४.विद्यार्थांच्या समोर शिक्षक स्वत:शिस्त प्रिय असावा. |
१३.मानसिक स्वास्थ व आवश्यक सेवा: १.बालसंस्कार केंद्र. २.बालमार्गदर्शन केंद्र. ३.शालेय समाज कार्य . ४.शालेय सकस आहार योजना. ५.शालेय वैदकिय तपासणी . ६.शालेय मानसोपचार . |
मुख्य पृष्ठ |