educational psychology 7

psychology
७.व्यक्तिभेद
१.व्यक्तिभेद :
व्यक्ति व्यक्ति मध्ये असणाऱ्या निरनिराळ्या प्रकारच्या अंतरालाच व्यक्तिभेद म्हणतात.
२.व्यक्तिभेदाचे लक्षणे:
१.शारीरिक : प्रत्येकाची शरीराची ठेवण वेगळी .
२.बौद्धिक : प्रत्येकाचा बुद्धांक वेगळा आहे.
३.भावनिक : दयाळू ,उदार,कंजूस,बहिर्मुख असतात.
४.कलाविषयक: कोणाला क्रिकेट,खो-खो ,कबड्डी ,लंगडी खेळ आवडतो.
५.अभिवृत्ती मुल्ये : कोणी सदाप्रसन्न,सदाकुढी असतात.
६.ग्रहण शक्ती : प्रत्येकाची ग्रहण शक्ती सुध्दा वेगळी असते.
३.व्यक्तिभेदाची करणे :
१.लिंगभेद : स्त्रिया भावना प्रधान,पुरुष विचार प्रधान असतो.
२.वय: तरुणाचे शरीर मजबूत तर वृद्धाचे क्षीण होते.
३.शारीरिक गुण दोष :शारीरिक व्यंग्य ,आंधळे,बहिरे-मुके असे दोष.
४.परिस्थिती :खेड्यातील,ग्रामीण व शहरी मुलांतील फरक.
५.अनुवांशिकता : आई –वडिलांचे गुणधर्म मुलांत येतात.
६.ज्ञानेद्रीयांची क्षमता: स्वाद,गंध,स्पर्श अनुभवण्याची क्षमता.
७.व्यक्तिमत्व : कोणी अंतरर्मुख,कोणी बहिर्मुख असतो.
८.अंतस्त्राव ग्रंथी : या ग्रंथीचा स्त्राव सगळ्याच्या शरीरात वेगळा असतो .
४.बुद्धी ही संकल्पना :
१.आल्फ्रेड बीने : बुद्धी ही विचार प्रक्रिया आहे.
१.विशिष्ट दिशा देण्याची व टिकवण्याची वृत्ती .
२.आपले ध्येय साध्यते साठी समायोजन शक्ती .
३.आत्मपरीक्षण शक्ती .
२.वूड्रो : नवीन ज्ञान प्राप्त करण्याची शक्ती म्हणजे बुद्धी .
३.वर्टा: बुद्धी म्हणजे जन्मजात सर्वकष मानसिक योग्यता.
बुद्धीची घटक सिद्धांत.
१.टर्मन : ज्या व्यक्तिची अमूर्त पातळी विचार करण्याची शक्ती जितकी अधिक तितकी ती व्यक्ति बुद्धिमान असते.
२.स्पिअरमन : व्यक्तित सामान्य घटक व विशेष घटक असतो.ज्या व्यक्तित विशेष घटक असतो ती व्यक्ति बुद्धिमान होय.
३.थोर्नडाईक : अर्मुत चिंतन ,यांत्रिक क्षमता.सामाजिक दृष्टी म्हणजे बुद्धी .
४.थस्टर्न :संख्यीकिक क्षमता,भाषिक क्षमता,शाब्दिक ओघाता,स्मुर्ती,तर्कशक्ती ,अवबोध क्षमता,अवकाश क्षमता म्हणजे बुद्धी होय.
५.गिलफोर्ड : १२० घटक सिद्धांत ४ गुणिले ५ गुणिले ६ आठवणे ,ओळखणे ,नवनिर्मिती करणे ,मूल्यमापन करणे.

५.बुद्धिमत्तेच्या विकासावर परिणाम करणारे घटक:
१.अनुवंश व परिस्थिती : मुलांमध्ये अनुवंशिकते कडून येणारे गुणधर्म .
२.लिंग भेद: स्त्रियांची व पुरुषाची बुद्धिमत्ता वेगळी आहे.
३.वंशभेद : पिड्यान-पिड्यातून मुलांत अनेक गुणधर्म येतात व त्याचा परिणाम बुद्धिमत्तेवर होतो.
४.शालेय दर्जा : बुद्धीमत्तेच्या विकासास संधी मिळते.
५.सास्कृतिक दर्जा : बुद्धिमत्तेचा विकास निश्चित होणे.
६.आर्थिक व सामाजिक दर्जा: चांगला असेल तर बुध्दिमत्तेचा विकास चांगला होईल.
७.बालसंगोपन : बालकांचे योग्य संगोपन झाले तर बुद्धिमत्तेचा विकास होईल .


 

६.बुद्धिमापन कसोट्याचे प्रकार :(जनक आल्फ्रेड बीने व सायमन )
१.वैक्तिक : शाब्दिक ,कृती ,मिश्र .
२.सामुहिक : शाब्दिक,कृती,मिश्र .
१.शाब्दिक: भाषा बोलण्यासाठी.
२.कृती : मुक्या –बहिऱ्यासाठी (डॉ.भाटीया )
३.मिश्र: शाब्दिक व कृती या दोन्ही मिळून तयार होते.
उदा-पेपर पेन्सिल कसोटी : ही प्रतिमा आरशात कशी दिसेल.आकृती काढणे.

 


८.मानसिक वय संकल्पना : (जनक आल्फ्रेड बीने)
१.मानसिक वयामुळे बौद्धिक विकासाची अधिक कल्पना येते.
२.व्यक्ति व्यक्तिमधील भिन्नता स्पष्ट करण्यासाठी मानसिक वय आवश्यक आहे.
९.बुध्दिमत्ते नुसार मुलांचे वर्गीकरण :(प्रमाण वर्ग व बुद्धांक )
१.निर्बुद्ध : ० ते २४
२.जड बुद्धीमत्ता: २५ ते ४९
३.मंदबुद्धीमत्ता: ५० ते ७९
४.अल्पबुद्धीमत्ता: ७० ते ७९
५.आप सामान्य बुद्धिमत्ता: ८० ते ८९
६.साधारण बुद्धीमत्ता: ९० ते १०९
७.शीघ्र बुद्धिमत्ता: ११० ते ११९
८.कुशाग्र बुद्धिमत्ता: १२० ते १३९
९.अलौकिक बुद्धिमत्ता: १४० ते १४९
१०.प्रतिभासंपन्न : १५० व त्यापेक्षा जास्त बुद्धांक .

९.बुद्धांकांचे सूत्र:
बुद्धांक = मानसिक वय / जन्म वय * १००
उदा :-वनिताचे मानसिक वय १० वर्षे व जन्मवय ८ वर्षे आहे तर तिचा बुद्धांक काढा?
मानसिक वय= १० वर्षे .
जन्म वय = ८ वर्षे .
बुद्धांक = मानसिक / जन्म वय * १००
बुद्धांक = १०/८ * १००
बुद्धांक =१२५ .
म्हणजे वनिता ही कुशाग्र बुध्दिमत्तेची मुलगी आहे.

उदा –सुनिलचा बुद्धांक १२० आहे.जन्म वय १० वर्षे आहे.तर तिचे मानसिक वय किती ?
बुद्धांक =१२०
मानसिक =?
जन्म वय = १० वर्षे .
बुद्धांक =मानसिक वय /जन्म वय * १००
१२० = मानसिक वय / १० * १००
मानसिक वय = १२०० /१००
मानसिक वय = १२ वर्षे .



 

१०.शिक्षकांने व्यक्तिभेद लक्षात घेऊन अध्यापन करतांना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी :
१.अभ्यासक्रम : बुध्दिमत्ते नुसार मुलांची स्वतंत्र शाळा किंवा स्वतंत्र तुकडी असावी व अलौकिक बुध्दिमत्ते च्या विद्यार्थात अहंगड व मंदबुद्धीच्या मुलांत न्यूनगंड निर्माण होऊ नये.
२.व्यक्तिगत मार्गदर्शन : विद्यार्थांचे वय,आवडी निवडी,अनुभव विश्व ,आकलन क्षमता,बौद्धिक स्तर लक्षात घेऊन शिक्षकांने अध्यापन करावे व मनोविकृती व अपंग मुलांसाठी तज्ञांचा सल्ला घेणे.
३.मुलांच्या बुध्दिमत्तेसाठी अवांतर उपक्रम :
१.बालगीते,समूहगीते, बडबडगीते,बालनाट्य.
२.सहली.
३.ज्ञानेद्रीयांना अनुभूती देणारे व्यवसाय.
४.तोंडी भाषेचे खेळ.
५.बौद्धिक स्पर्धा.
६.वत्कृत्व स्पर्धा .
४.सपंन्न अभ्यासक्रम :विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासाला प्रेरणा देणे म्हणजे संपन्न अभ्यासक्रम होय.प्रज्ञावान व वैशिष्टपूर्ण बालकासाठी संपन्न अभ्यासक्रम असावा.

११.पर्यवेक्षित अभ्यासक्रम ( प्रो.हॉलक्वेस्ट )
पर्यवेक्षित अभ्यासक्रम: पाहणे,लक्ष देणे,चुकले तिथे मार्गदर्शन करणे म्हणजे पर्यवेक्षित अभ्यासक्रम होय.
१.कोणत्या घटकांच्या अभ्यासक्रमासाठी पर्यवेक्षण तंत्र वापरायचे हे निश्चित करणे.
२.वेळापत्रकाप्रमाणे त्या तासिकांचा उल्लेख करणे आवश्यक आहे.
३.विद्यार्थांच्या चूका दुरुस्त करण्यासाठी शिक्षकांने मार्गदर्शन करणे.
४.विद्यार्थांच्या चूका सुधारणा झाली किंवा नाही यांची पाहणी करणे.

पर्येक्षित अभ्यासक्रमाचे फायदे:
१.शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा फायदा .
२.विद्यार्थांना स्वत:च्या गतीने अभ्यासक्रम पूर्ण करतात.
३.शिक्षकाला विद्यार्थांच्या शंका व अडचणी कळतात.
४.विद्यार्थांना व्यक्तिगत मार्गदर्शनाची गरज नाही .
५.विद्यार्थांना वाचनाची सवय लागते.
६.विद्यार्थी स्वत:आपल्या समस्या सोडवितात .

मुख्य पृष्ठ