३.प्राथमिक स्तरावर विद्यार्थांच्या गरजा व समस्या |
१.बालकल्याण व त्याचे मुख्य तत्वे : बालकल्याण : बालकांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी तस्या सोयी त्यांच्यासाठी उपलब्ध करून देणे म्हणजे बालकल्याण होय.बालकल्याण ही संकल्पना बालाशिक्षाणातून मांडली आहे. बालकल्याणची मुख्य तत्वे : १.स्वतंत्र व्यक्तिमहत्व :-बालक म्हणजे माणसाची लघु आवृत्ती नव्हे त्याला स्वतंत्र अस्थितत्व आहे. २.गती:-बालकांची वाढण्याची एक गती आहे. ३.मुलभूत गरजा : घराची मोठी मोठी माणसे पूर्ण करतात. ४.समस्या: आजारपण ,अपंगत्व ,कु -समायोजन . |
२.बालकल्याण व बालशिक्षण यांचा संबंध : बालाशिक्षाणातून १.विद्यार्थांचे स्वास्थ सुधारणे. २.विद्यार्थांची ज्ञानात्मक पातळी वाढवणे. ३.विद्यार्थांत अभिरुची निर्माण करणे. ४.विद्यार्थांत अभिवृत्ती निर्माण करणे. ५.विद्यार्थांत सर्जनशीलता निर्माण करणे. |
३.संयुक्त राष्ट्र संघटनेने बालकाला दिलेले अधिकार : १.जन्माच्या वेळी नावं व राष्ट्रीयत्व . २.आई –वडिल व कुटुंब यांच्या कडून योग्य जबाबदारी पाळली जाणे. ३.आरोग्याची काळजी वाहणे. ४.सकस आहार मिळणे. ५.निवारा व पोषणाचे कर्तव्य समाजाकडून पाळले जाणे. ६.प्राथमिक शिक्षण मोफत मिळणे . ७.खेळाची व्यवस्था होणे. ८.जात,धर्म,भाषा,यांचे रक्षण होणे. ९.शोषणापासून रक्षण होणे. १०.निराधार व अनाथबालकाची विशेष काळजी वाहणे. |
४.बालकल्याणकारी संस्था व त्याची कार्य : १.मुबईची चिल्ड्रन एड सोसायटी . २.हजारी बागची पालट रिचर्स सेंटर . ३.बलाकनजी बारीची स्थापना १९२० साली झाली. ४.महिला परिषेदेची बालकल्याण परिषद १९५२ साली स्थापना झाली. ५.संयुक्त राष्ट्र संघटनेने बाल वर्ष १९७९ साजरे केले. ६.छंद केंद्र :-विद्यार्थांच्या विविध कला गुणांन वाव देणे. ७.क्रिडा केंद्र:-विद्यार्थांना विविध खेळ खेळण्यासाठी. ८.पाळणा घर :-घरातील दोघे माणसे नोकरीवर असल्यावर . ९.अनाथालय :-विद्यार्थांना कोणी जवळचे नसल्यावर . १०.सुधारणा :-बालागुन्हेगारी दूर करणे . |
५.विद्यार्थांच्या गरजांचे प्रकार : |
६.विद्यार्थांच्या गरजापूर्ण न झाल्यास होणारे परिणाम : १.जैविक किंवा शारीरिक गरजा: कु-पोषण होते,गर्भात होणे. २.मानसिक गरजा:-कुढी बनतात,एकलकोंडे बनतात. ३.सामाजिक गरज:-कु-समायोजन होऊन गुन्हेगारी वृतीकडे ओळखतात. |
७.विद्यार्थांच्या गरजा लक्षात घेऊन शाळेत योजावयाचे उपक्रम : १.विद्यार्थांना शाळेतून पाट्या,वह्या ,पुस्तके ,गणवेश मोफत देणे. २.विद्यार्थांना प्रेमाने वागवणे. ३.विद्यार्थांना सामाजिक कार्यात सर्वांना संधी देणे. |
८.विद्यार्थांच्या समस्या : २.परिस्थितीजन्य समस्या:- |
|
१०.शाळा बाह्य विद्यार्थांच्या समस्या व त्यावर उपाय: १.विद्यार्थांना आर्थिक मदत म्हणून शिष्यवृत्ती देणे. २.विद्यार्थांची बेकारी नष्ट करण्यासाठी नोकरी देणे. ३.विद्यार्थांसाठी सकस आहार योजना राबविणे . ४.विद्यार्थांच्या पालकांचे अज्ञान दूर करणे. ५.विद्यार्थांना शहरी झगमगाटी पासून दूर ठेवणे. ६.विद्यार्थांना चांगले संस्कार देणे. |
११.निरक्षर पालक असलेल्या विद्यार्थांच्या समस्या व त्यावर उपाय : १.निरक्षरता चे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करणे. २.निरक्षरता कमी करण्यासाठी प्रौढ शिक्षण घेणे. ३.पालकांची जागृती करणे. ४.शिक्षक-पालक संघटना ,माता-पालक संघटना स्थापना करणे. ५.विद्यार्थांना शाळेत चांगले संस्कार करणे. ६.विद्यार्थांसाठी वस्तीगृहांची सोय करणे. |
१२.भिन्न सामाजिक वातावरणातून आलेल्या विद्यार्थांच्या समस्या व त्यावर उपाय: १.विद्यार्थांसाठी निकोप वातावरणाची निर्मिती करणे. २.विद्यार्थांना कळेल त्या भाषेत शिकवणे. ३.विद्यार्थांतील न्यूनगंड दूर करणे. ४.विद्यार्थांना प्रोत्साहन देणे . ५.विद्यार्थांना विविध सोयी उपलब्ध करून देणे. विद्यार्थांना सहानुभूतीची वागणूक देणे. |
१३.शारीरिक व्यंग असणाऱ्या विद्यार्थानाच्या समस्या व त्यावर उपाय: १.अपंग मुलासाठी स्वतंत्र शाळा असावी. २.विद्यार्थांत शारीरिक दोषामुळे विकलांग निर्माण होणार नाही काळजी घेणे. ३.विद्यार्थात शारीरिक दोषामुळे न्यूनगंड निर्माण होऊ नये. ४.विद्यार्थांचा आत्मविश्वास कमी होऊ नये. ५.विद्यार्थांत असुरक्षिततेची भावना बळावू नये. |
१४.मानसिक दौर्बल्य असलेल्या विद्यार्थांच्या समस्या व त्यावर उपाय: १.जडबुद्धी :-सामान्य मुलांबरोबर शिक्षण होत नाही म्हणून स्वतंत्र शाळा किंवा स्वतंत्र तुकडी असावी . २.अल्पबुद्धी : स्वताहून कोणतेच काम करता येत नाही म्हणून शिक्षकाने वेळोवेळी मार्गदर्शन करावे. ३.मंदबुद्धी : साधारण हलकी फुलकी कामे करू शकतात.म्हणून त्यांच्या आवडीनुसार शिकवावे . ४.साधारणबुद्धी :शिक्षण मंदगतीने होते म्हणून या मुलांना यांच्या गतीने जाण्याची सोय असावी. |
१५.प्रज्ञावान किंवा वैशिष्टपूर्ण बालकांच्या समस्या व त्यावर उपाय: १.अभ्यासक्रम हा सर्व सामान्य मुलांना दृष्टीसमोर ठेवून तयार केलेला असतो म्हणून ह्या मुलांना काही भाग महत्वाचा वाटत नाही तेव्हा यांच्या साठी स्वतंत्र शाळा असावी उदा:- नवद्य विद्यालय . २.जर विद्यार्थांना स्वतंत्र शाळा नसेल तर आपलाच शाळेत "अ' वर्गाच्या तुकडीत अशा मुलांनाचा प्रवेश निश्चित करावा. ३.जर शाळा अपुरी असेल तर या मुलांना सर्व सामान्य मुलांपेक्षा अधिक काम देण्यात यावे उदा:- रिकाम्या वेळेत दुसऱ्या मुलांना गणित शिकवणे. |
१६.भिन्न –भिन्न प्रवृत्तीच्या मुलासाठी भिन्न –भिन्न प्रकारच्या शाळा हव्यात : १आंधळ्या मुलांसाठी शाळा:-डॉ ब्रेल ची लिपी गाणे म्हणणे वाद्य वाजवणे ,स्वत:च्या पायावर उभे राहून चालणे. २.बहिऱ्या मुलांसाठी शाळा :-चित्रकला,पेंटिंग ,सुतारकाम ,टेलरिंग , ३.वेडसर मुलांसाठी शाळा:-मातीची खेळणी ,चटया विणणे ,कागद काम करणे. ४.मंद मुलांसाठी शाळा :-चित्रकला ,रंगकाम ,कागद काम,टाकाऊ वस्तूपासून विविध वस्तू बनविणे. ५.सामान्य मुलांसाठी :-श्रवण,भाषण ,वाचन,लेखन. |
मुख्य पृष्ठ |